रिव्हर मार्च कार्यकर्त्यांचा पुढाकार

‘रिव्हर मार्च’ या मोहिमेंतर्गत शहरातील नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या नद्यांच्या संवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आले असून, या अभियनांतर्गत रविवारी पोयसर नदीत ‘केना’ वनस्पती सोडण्यात आली. ‘केना’ ही वनस्पती पाणी शुद्ध करण्याचे कार्य करते. यामुळे पोयसर नदीच्या शुद्धीकरणाला मदत होणार असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. मुंबईतील नद्यांमध्ये अशा प्रकारे जलशुद्धीकरणाला पोषक असणारी वनस्पती सोडण्याचा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात

स्वच्छ नदी अभियानांतर्गत मुंबईतील ‘रिव्हर मार्च’च्या कार्यकर्त्यांनी रविवारी पोयसर नदीत प्रायोगिक तत्त्वावर एक अनोखा उपक्रम केला. त्यांनी ‘केना’ या जलशुद्धीकरणासाठी उपयुक्त ठरणारी वनस्पती नदीपात्रात सोडण्यात आली. ‘रिव्हर मार्च’ मोहिमेत मिठी, ओशिवरा, पोयसर आणि दहिसर या नद्यांच्या संवर्धनासाठी पर्यायाने त्यांच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या मोहिमेमार्फत दर रविवारी कार्यकर्त्यांकडून पोयसर नदीपात्रातील कचाऱ्याचा उपसा केला जातो. मात्र या रविवारी कार्यकर्त्यांनी जलशुद्धीकरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘केना’ वनस्पती नदीपात्रात सोडली.

केना वनस्पतीची मुळे पाण्यातील दूषित घटक  नष्ट करून जलशुद्घीकरणाला मदत करते. त्यामुळे ती नदीपात्रात सोडण्याचा प्रायोगिक उपक्रम रविवारी राबविण्यात आल्याची माहिती ‘रिव्हर मार्च’चे तेजस शहा यांनी दिली. त्यासाठी सहा फूट लांबी-रुंदीचा प्लॅस्टिकच्या निरु पयोगी बाटल्यांपासून तयार करण्यात आलेल्या चौकोनी साच्यात या वनस्पती लावून त्या हिरानंदानी इस्टेट मागील नदीपात्रात सोडण्यात आल्याचेही शहा यांनी सांगितले. प्रायोगिक स्वरूपात हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती ‘रिव्हर मार्च’चे कार्यकर्ते सागर विरा यांनी दिली. तसेच भविष्यात पोयसर रेल्वे पूल ते डहाणूकरवाडी दरम्यानच्या नदीपात्रात पालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम मोठय़ा स्वरूपात राबविण्याचा विचार असल्याचे विरा यांनी सांगितले. यासाठीचा प्रस्ताव पालिकेला दिला असून यासाठी साधारण ७० ते ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.