ठाण्यात २ आणि ३ डिसेंबर रोजी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’
दहावी-बारावीनंतर कशात करिअर करायचे? त्याचे मार्ग काय आहेत? परीक्षेच्या काळात जाणवणाऱ्या तणावाला कसे सामोरे जायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात मिळणार आहेत. २ आणि ३ डिसेंबर रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे हा कार्यक्रम होणार आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यालंकार प्रस्तुत या कार्यक्रमासाठी एमआरएम युनिव्हर्सिटी यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे.
* कार्यक्रमातील प्रत्येक सत्रानंतर विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधून आपल्या प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.

* परीक्षांच्या तणावाचा सामना कसा कराल? करिअर निवडताना घ्यायची काळजी : डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचार तज्ज्ञ
* व्यक्तिमत्त्व व सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व : गौरी खेर, सॉफ्ट स्किलविषयक प्रशिक्षक
* दहावी किंवा बारावीनंतर काय? तसेच कला,
वाणिज्य आणि विज्ञान-तंत्रज्ञान आदी अभ्यासशाखांचे पर्याय : विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक

कार्यक्रमाच्या प्रवेशिका येथे उपलब्ध..
* लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रस्ता, नौपाडा, ठाणे (पश्चिम)
* हॉटेल टिपटॉप प्लाझा, एलबीएस रस्ता, तीन हात नाका, ठाणे (पश्चिम)
* विद्यालंकार क्लासेस, इशान आर्केड-२, तिसरा मजला, हनुमान मंदिरासमोर, गोखले रस्ता, ठाणे (पश्चिम)
० प्रवेशिका मिळण्याची वेळ : सकाळी १० ते सायं. ५