पॅरिसमधील ‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकात प्रसिद्ध करण्यात आलेले व्यंगचित्र छापल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने बुधवारी ‘अवधनामा’ या उर्दू दैनिकाच्या संपादक शिरीन दळवी यांना १० फेब्रुवारीपर्यंत अटक होण्यापासून दिलासा दिला.
दळवी यांच्याविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनीही गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली.
‘शार्ली हेब्दो’मध्ये प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र १७ जानेवारी रोजी ‘अवधनामा’मध्ये प्रसिद्ध केले होते. याविरोधात ठाण्यातील उर्दू पत्रकार संघाने दैनिक व या दैनिकाच्या संपादकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
तक्रार केल्यावर पोलिसांनीही दळवी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करून जामिनावर सोडण्यात आले होते.
या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनीही गुन्हा दाखल केल्याने अटक टाळण्यासाठी दळवी यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायालयाने त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत अटक करू नका, असे आदेश देत तूर्त दिलासा दिला. तसेच १० फेब्रुवारी रोजी प्रकरणाची सुनावणी ठेवली.