शीनाशी संबंधित सर्व कागदपत्रे राहुल मुखर्जी याने रविवारी शीना हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. ही कागदपत्रे या तपासातील महत्त्वाचा दुवा असून त्यामुळे पीटरचाही सहभाग स्पष्ट होण्यास मदत होणार असल्याची माहिती सीबीआयमधील एका अधिकाऱ्याने दिली. शीना हत्याप्रकरणात इंद्राणी मुखर्जी हिच्यासह तिचा पहिला पती संजीव खन्ना, चालक शामवर राय यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्याच्या दिवशीच सीबीआयने दुसरा पती पीटर मुखर्जी याला अटक केली.