महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, खासगी निर्जनस्थळी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.
सार्वजनिक ठिकाणी प्रकाश व्यवस्था करणे, खासगी निर्जनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच सुरक्षा रक्षक तैनात करणे, इत्यादी उपाययोजनांचा आढावा घेऊन वेळोवेळी महिलांच्या सुरक्षेबाबत तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.