24 May 2016

बाळासाहेबांना भेटण्यासाठी दिग्गज ‘मातोश्री’वर

काल (बुधवार) रात्री उशीरा बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती खूपच चिंताजनक असल्याची माहिती मिळाल्यानंतर विविध क्षेत्रातील

मुंबई | November 15, 2012 3:33 AM

काल (बुधवार) रात्री उशीरा बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती खूपच चिंताजनक असल्याची माहिती मिळाल्यानंतर विविध क्षेत्रातील मंडळींनी काल रात्रीपासूनच मातोश्रीला भेट द्यायला सुरूवात केली आहे. कला, राजकारण, उद्योग अशा सर्वच क्षेत्रातींल मंडळी येथे हजेरी लावत आहेत. तसेच शिवसेनेच्या हजारो शिवसैनिकांनी काल रात्रीपासूनच मातोश्रीच्या बाहेर गर्दी करायला सुरूवात केली आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर.पाटील आणि राष्ट्रवादीचे नेचे मधुकरराव पिचड हेसुध्दा मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी पोहोचणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल रात्रीच आपल्या कुटुंबीयांसमवेत मातोश्रीवर दाखल झाल होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार बाळा नांदगावकर हेसुध्दा उपस्थित होते.    

कला क्षेत्र  : अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नाना पाटेकर, सलमान खान, अरबाज खान, सलीम खान, मधुर भांडारकर, संजय दत्त, मान्यता दत्त

राजकारण : शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष), नितीन गडकरी (अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष), सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, संजय राऊत (शिवसेना खासदार आणि दै. सामनाचे संपादक), गोपीनाथ मुंडे (भाजप), रामदास आठवले (रिपाई), शिवसेना नेते अनंत गिते, विनोद तावडे (विरोधी पक्ष नेते), हुसेन दलवाई (कॉंग्रेस खासदार), वसंत डावखरे (विधानसभेचे सभापती), देवेंद्र फडणवीस (भाजप), मनोहर जोशी, अनिल देसाई, सुभाष देसाई, विनायक राऊत, रामदास कदम, दिवाकर रावते
 
उद्योग : वेणूगोपाल धूत, राहुल बजाज

First Published on November 15, 2012 3:33 am

Web Title: celebrity visits ailing balasaheb