मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
भ्रष्टाचार करणे आणि तो पचवणे, एवढेच सत्ताधारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम उरले आहे. त्यामुळेच त्यांच्या मंत्र्यांची पोटं सुटली आहेत आणि आमच्या कामगारांची पोट सुकत चालली आहेत, या शब्दांत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर सोमवारी टीकास्त्र सोडले.
महागाईविरोधात राज्यातील ३४ कामगार संघटनांनी मुंबईमध्ये सोमवारी लॉंग मार्च काढला होता. त्या मोर्चाचा समारोप आझाद मैदानावर सभेने झाला. या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांवर शाब्दिक हल्ला चढविला.
ते म्हणाले, राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे आणि राष्ट्रवादीचे मंत्री शाही थाटात लग्न करण्यात आणि सहस्रभोजनं घालण्यात दंग आहेत. हे सर्वजण खाऊन-पिऊन सुस्त झाले आहेत. शरद पवार यांच्या 'झोपे'मुळेच मंत्री पैसा ओरबडत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही शरद पवारांसारखा कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही.
एकजुटीचे महत्त्व काय असते, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे यापुढे युनियनच्या वेगवेगळ्या चुली बंद करून, एकच होळी पेटवा ज्यामध्ये सरकार भस्मसात होईल. ही एकजूट निवडणुकीपर्यंत दाखविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
देशभरातील कामगार संघटनांनी २० आणि २१ तारखेला पुकारलेल्या संपामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे कोणतेही हाल होणार नाहीत, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.



















उद्धव ठाकरे, तुमच्या सौभाग्यवती ऑडीसारख्या आलिशान श्रेणीच्या गाडीतून फिरतात. तुमच्या वहिनीबाईनी जुहूला बंगला बांधला. तुमच्या मोठ्या पुतण्याचे बार्स आणि परमिट रूम्स आहेत, हे काय प्रामाणिक उद्योगांचे फलित आहे काय?
तुमचे नगरसेवक आणि आमदार राहिले लांब, मिलिंद नार्वेकरांची संपत्ती कुठल्या कष्टातून आली तेदेखील जाहीर सभेत सांगत जा.
आधी स्मार्ट दिसा, स्मार्टपणे बोला. बापाने कमवले ते पोरगे लेन-देन करून घालवणारसे दिसतेय.