ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुरान्तो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक दीड तास विस्कळीत झाली. अप जलद मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाडय़ा सहाव्या मार्गावरून मुंबईच्या दिशेने वळविण्यात आल्या, तर जलद लोकल गाडय़ा धीम्या मार्गावरून पुढे आणल्या गेल्या. या घटनेमुळे गाडय़ांची वाहतूक २० ते २५ मिनिटे सुरू होती. त्याचा फटका अनेक प्रवाशांना बसला.