रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक असताना मध्य रेल्वेच्या वाहतूकीत अधिक अडचण निर्माण झाली आहे.  कळवा स्थानकाजवळ पेन्टाग्राफ तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु असल्याचे कळते. रविवारचा मेगाब्लॉक आणि त्यात पेन्टाग्राफ तुटल्याने प्रवाशांचे अधिक हाल झाले आहेत.