मध्य रेल्वे
कधी- रविवार, १५ फेब्रुवारी २०१५. सकाळी १०-४५ ते दुपारी ३-१५
कुठे- माटुंगा ते मुलुंड डाउन जलद मार्गावर
परिणाम- मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून डाउन जलद मार्गावरील सर्व वाहतूक सकाळी १०-०८ ते दुपारी २-५४ या वेळेत माटुंगा ते मुलुंड या स्थानकादरम्यान डाउन धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे.
त्यामुळे या गाडय़ा सर्व स्थानकांवर थांबतील. ठाण्यापासून पुढे या गाडय़ा डाउन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.
सकाळी १०-४६ ते दुपारी ३-२८ या कालावधीत ठाण्याहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप जलद मार्गावरील उपनगरी गाडय़ांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबा देण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे
कधी- रविवार, १५ फेब्रुवारी २०१५. सकाळी ११-३० ते दुपारी ३.३०
कुठे- कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अप हार्बर मार्ग आणि वडाळा रोड ते माहीम अप व डाउन हार्बर मार्ग
परिणाम- छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून वांद्रे, अंधेरीच्या दिशेने (डाउन) तसेच वांद्रे व अंधेरी येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने (अप) सुटणाऱ्या गाडय़ांची वाहतूक अनुक्रमे सकाळी १०-२० ते दुपारी ३-३३ आणि सकाळी १०-४० ते दुपारी ३-१७ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
कुर्ला येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेकडे (अप हार्बर मार्ग) जाणारी वाहतूक सकाळी ११-०८ ते दुपारी ३-२० या वेळेत भायखळा रेल्वे स्थानकापर्यंत मेन लाइनच्या अप जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे. या गाडय़ांना शीव, माटुंगा, दादर आणि परळ स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. पुढे भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यान ही वाहतूक अप धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना वांद्रे व अंधेरी येथे जाण्यासाठी सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत मेन लाइन व पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.