गर्दीच्या स्थानकांत महाकाय पंखे

मुंबईतील दमट हवामान आणि उन्हाच्या काहिलीने घामाघूम होण्यापासून प्रवाशांना वाचविण्यासाठी मध्य रेल्वेवरील स्थानकांत महाकाय पंखे बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात (सीएसएमटी) नऊ महाकाय पंखे आहेत. याशिवाय अन्य दोन स्थानकांत अशा स्वरूपाचे आणखी आठ पंखे बसविण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकांवर संपूर्ण पंखे मार्च २०१८ पर्यंत बसविण्यात येणार आहेत. या पंख्यांसाठी गर्दीच्या स्थानकांची निवड करण्यात आली आहे. यात कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसएमटी स्थानकांचा समावेश आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नव्या प्रवेशद्वारावर, कल्याणमधील बुकिंग हॉलजवळ आणि सीएसएमटी येथील मेन लाईन स्थानक आणि लांब पल्ल्याच्या मधील भागात पंखे बसवण्यात येणार आहेत.

  • २४ फुटी पंख्याची वारा फेकण्याची क्षमता भिंतीवरील सहा मध्यम आकाराच्या पंख्यांएवढी आहे.
  • महाकाय पंख्यांमुळे विजेची मोठय़ा प्रमाणावर बचत होते.
  • या पंख्याची किंमत साडे तीन लाख रुपये आहे. येत्या दोन महिन्यात सीएसएमटी स्थानकात दोन पंखे बसवण्यात येणार आहेत.