दीर्घकालावधीनंतर नवीन चारोळ्या संग्रह रसिकांच्या भेटीला
‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’च्या आजच्या जमान्यापूर्वी तरुणाईला ज्या चारोळ्यांनी भुरळ घातली होती आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ते ज्या चारोळ्यांचा उपयोग करत होते त्या चारोळ्यांचे कर्ते चंद्रशेखर गोखले यांचा नवा चारोळी संग्रह उपलब्ध होणार आहे. या चारोळी संग्रहातील बहुतांश चारोळ्या या पंचविशीतील अवखळपणा दर्शविणाऱ्या असून संग्रहाचे नाव ‘मंचविशी प’ असे आहे.
दीर्घ कालावधीनंतर गोखले यांचा हा चारोळी संग्रह रसिकांपुढे येत आहे. गोखले यांच्या ‘मी माझा’ या काव्यसंग्रहाने एके काळी तरुणाईला भुरळ पाडली होती. मनातील भावना व्यक्त करणारे ‘तयार’ माध्यम यानिमित्ताने त्यांना मिळाले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांच्या या चारोळ्या अगदी तोंडपाठ झाल्या होत्या. ‘मी माझा’नंतर ‘मी’, ‘पुन्हा मी माझा’, ‘मी नवा’, ‘माझ्यापरीने मी’ आदी चारोळी संग्रह प्रकाशित झाले होते. गोखले यांची कवी आणि कथालेखक अशीही ओळख असली तरी त्यांची खरी ओळख आजही ‘चारोळी’कार म्हणूनच रसिकांना आहे.
चारोळी संग्रहाच्या मुखपृष्ठावर गोखले यांचे पंचविशीतले छायाचित्र असून मलपृष्ठावर गोखले यांनी केलेली
‘डोळे भरुन आले की
तुझं रुप दिसायला लागतं
छे! ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी
हलक्या हाताने कोणी पुसायला लागतं’
अशी चारोळी देण्यात आली आहे.
येत्या १८ एप्रिल रोजी ‘मी माझा’ या चारोळी संग्रहाला २६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ‘मंचविशी प’ हा कविता/चारोळी संग्रह प्रकाशित होत आहे. या संग्रहात २५ चारोळ्या असतील. चारोळी संग्रहाचा वेगळा असा प्रकाशन सोहळा होणार नाही; पण १८ तारखेपासून हा संग्रह प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल, अशी माहिती गोखले यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

चारोळी संग्रह सहा प्रकाशकांनी नाकारला
‘मी माझा’ हा चारोळी संग्रह सहा प्रकाशकांनी नाकारला होता. त्यानंतर तो मी स्वत:च प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरचे माझे सर्व चारोळी संग्रह मीच प्रकाशित केले. हा नवीन चारोळी संग्रह माझी पत्नी उमा गोखले यांनी प्रकाशित केला आहे. ‘मंचविशी प’मधील सर्व चारोळ्या ओढ, हुरहुर, प्रणयाशी संबंधित असल्याचेही ते म्हणाले.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !