वेरावली टेकडी जलाशयावरून पाणीपुरवठा होणाऱ्या एच-पश्चिम विभागातील सांताक्रूझ, खार व वांद्रे (प.) या विभागांच्या पाणीपुरवठय़ाच्या वेळांमध्ये बदल करण्यात येणार असून त्याची चाचणी ५ मे रोजी घेण्यात येणार आहे. सांताक्रूझ, खार व वांद्रे (प.) परिसरात सध्या सकाळी ८.३० ते ११ या वेळेत पाणीपुरवठा केला जातो. या विभागाला भविष्यात सकाळी ६ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. येत्या ५ मे रोजी नव्या वेळेनुसार सकाळी ६ ते ९ दरम्यान या विभागांना पाणीपुरवठा करून चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या विभागांना नव्या वेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठय़ाच्या वेळेतील बदलाची या परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.