कांदिवली आणि मालाड परिसरातील पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी महापालिकेच्या जलविभागातर्फे क्रांतीनगर, आकुर्ली रोड येथे १५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर ७५० मि.मी. व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम ३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कांदिवली आणि मालाड परिसरातील पाणीपुरवठय़ाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले असून सकाळी ६.३० ते सायंकाळी ७.३० दरम्यान टप्प्याटप्प्याने विविध भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
जलवाहिनीच्या कामामुळे कांदिवलीतील नेबरहूड झोन, अनिता नगर, ऑर्चिड, लोखंडवाला, कांदिवली (पू.) या परिसरातील नागरिकांना मंगळवारीदुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळीत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. आलिका नगर, लोखंडवाला, कांदिवली (पू.) या परिसरत दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत पाणीपुरवठा होईल. स्पिंग लिफ, व्हिस्परिंग पाम, गंगा बावडी, लोखंडवाला, कांदिवली (पू.) या परिसरात सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येणार आहेत.
कांदिवली पश्चिम (आर-दक्षिण) परिसरातील लोखंडवाला, म्हाडा वसाहत, कांदिवली (पू.) या परिसरात सकाळी ६.३० ते सकाळी ११.३०, आझाद चाळ, शिवशाही चाळ, कांदिवली (पू.)मध्ये सकाळी ६.३० ते सकाळी ८.३०, तर मालाड पश्चिमेच्या (पी-उत्तर) आप्पा पाडा परिसरात सकाळी ६.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.