21 September 2017

News Flash

अजितदादा आणि तटकरेंची अद्याप चौकशीच सुरू

छगन भुजबळ तुरुंगात..

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 14, 2017 1:29 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

छगन भुजबळ तुरुंगात..

सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेली दीड वर्षे तुरुंगात असतानाच सिंचन घोटाळ्यात अजित पवार आणि सुनील तटकरे या दोन माजी मंत्र्यांची मात्र अद्यापही चौकशीच सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादीतील समझोत्यातून (फिक्सिंग) सारी चक्रे पडत असल्याची चर्चा आहे.

रायगड जिल्ह्य़ातील कोंढाणा प्रकल्प सिंचन घोटाळ्यात दोनच दिवसांपूर्वी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात आरोपपत्र सादर केले. त्यात अधिकाऱ्यांच्या विरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले असून, तटकरे यांची अद्याप चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोकणातील अन्य एका प्रकल्पाच्या संदर्भात सादर झालेल्या आरोपपत्रात अजित पवार यांची चौकशी सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. म्हणजेच अजितदादा आणि तटकरे या दोन तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांच्या विरोधात गेली अडीच वर्षे नुसतीच चौकशी सुरू आहे. ही चौकशी कधी पूर्ण होणार याचेही उत्तर नाही.

बांधकाम घोटाळ्यात छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्याच वेळी अजित पवार आणि तटकरे या दोन नेत्यांच्या विरोधात भाजप सरकारने अस्ते कदम भूमिका घेतली आहे. भाजप नेत्यांनी मनात आणल्यास अजितदादा किंवा तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या विरोधात कारवाई होऊ शकते. पण सारे जर, तरवर अवलंबून आहे.

 

First Published on September 14, 2017 1:29 am

Web Title: chhagan bhujbal ajit pawar sunil tatkare
 1. R
  Ravindra Sawant
  Sep 14, 2017 at 10:23 am
  मोदीने स्वतःला कितीही स्वच्छ प्रतिमेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येक निर्णयामध्ये हा माणूस किती हलकट आहे याचा प्रत्यय जनतेला येत आहे न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणणारा आपल्या सरदारांच्या भ्रष्ट्राचाराबाबतीत तोंडात पाणी घेऊन बसतो किंवा वाचा गेल्या सारखा असतो आता या प्रकरणात स्वाभिमान, बाणेदारपणा आणि बरीच अशी विशेषणे स्वतःला चिकटवून मिरवणारा हाच माणूस हीच सगळी विशेषणे शरद पवारांच्या पायाशी ठेवून आपली सत्ता वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि या अश्या माणसावर विश्वास ठेवत याला २०१९ मध्ये मते द्यायची ? जे देतील त्यांनी देखील स्वाभिमान आणि अक्कल गहाण ठेवली आहे हेच म्हणावे लागेल
  Reply
  1. राजाराम भारतीय
   Sep 14, 2017 at 9:50 am
   या दोनही टग्यांना लवकरात लवकर "आत" घ्यावे.
   Reply
   1. R
    rahul
    Sep 14, 2017 at 9:17 am
    गुरु आणि शिष्याचे नातं आहे त्यांचे आणि भाजप च्या सर्वे सर्वा चे.. बिचारा भुजबळ ...खाया पिया कूच नहीं गिलास तोडा बारा आणा !!!!!!!!!
    Reply
    1. A
     anand
     Sep 14, 2017 at 8:01 am
     श्री मोदी राज्यावर असे पर्यंत ही चौकशी चालूच राहाणार. तसे सेटिंग झालेले दिसतेय.
     Reply
     1. K
      Kamalakaant Chitnis
      Sep 14, 2017 at 7:20 am
      मराठ्यांच्या मूकमोर्चाची "शरद पवारी" दहशद व शह बसलेले व शिवसेनेच्या कटकटींनी हैराण झालेले फडणवीस सरकार राष्टवादी व काँग्रेस आमदारांसाठी गळ टाकून बसले आहेत. नारायण राणे गळाला लागलेत पण भाजप आमदारांच्याच अंतर्गत विरोधामुळे त्यांना आत घेण्यास अडचणी येताहेत.म्हणूनच अजित पवार व तटकरे यांना "टांगणी"ला लावून ठेवले आहे हे उघड आहे!
      Reply
      1. Load More Comments