काश्मीर म्हणजे भारताचे नंदनवन! पृथ्वीच्या पाठीवर कुठे स्वर्ग असेल तर तो काश्मीरमध्ये असे या नयनरम्य प्रदेशाचे वर्णन केले जाते. मुंबईमध्येही एक नयनरम्य परिसर आहे, जो मुंबईचे फुप्फुस म्हणून ओळखला जातो.. छोटा काश्मीर! काश्मीरप्रमाणेच येथे निसर्गसौंदर्य नटलेले आहे, हिरवाई आणि मोकळी हवा यामुळे हा परिसर मुंबईचे नंदनवन झाले आहे, म्हणूनच त्याला छोटा काश्मीर असे म्हणतात.
गोरेगावच्या आरे कॉलनीत एका टेकडीवजा जागेवर छोटा काश्मीर वसलेले आहे. हिरवाईने नटलेला आरे कॉलनीचा परिसर म्हणजे शुद्ध हवेचा जणू कारखानाच. मुंबईतील अन्य भागांपेक्षा येथील तापमान ४ ते ५ अंशानी कमीच असते, याचे कारण म्हणजे येथे असलेली वृक्षसंपदा. हिरवीगार झाडे आणि त्यामुळे असणारी मोकळी हवा यामुळे या परिसरात फिरायला येणे पर्यटकांना आवडते. आरे कॉलनीमध्ये विविध ठिकाणी तीन बागा आहेत, मात्र त्यापैकी सर्वात लोकप्रिय बाग म्हणजे छोटा काश्मीर.
अनेक फुलझाडे, डेरेदार वृक्ष, शोभेच्या वनस्पती आणि हिरवळ यांमुळे हा परिसर अतिशय सुंदर वाटतो. झाडांची काळजीपूर्वक केलेली पैदास आणि रचना यांमुळे परिसराच्या रमनीयतेत भर पडते. बागेचे सौंदर्य आणखी खुलून दिसावे यासाठी मुद्दामहून काही ठिकाणी शिल्पे ठेवण्यात आली आहेत. गोरेगावचा आराखडा दाखविणारा नकाशा, थुईथुई उडणारी कारंजी, चबुतरे यांमुळे हा परिसर अतिशय नयनरम्य वाटतो, जणू काश्मीरमध्येच फिरत आहोत, असा भास होतो.
चित्रनगरी असलेल्या मुंबईतील या परिसराचा मोह चित्रपट निर्मात्यांनाही सुटला नाही. त्यामुळे अनेक हिंदी, मराठी आणि अन्य भाषेतील चित्रपटांचे चित्रीकरण या परिसरात झाले आहे. जुन्या चित्रपटांमध्ये प्रणयगीते चित्रित करण्यासाठी दिग्दर्शकाला छोटा काश्मीरशिवाय इतर दुसरी जागाच सापडायची नाही. ‘गाइड’, ‘धूल का फुल’, ‘दिल एक मंदिर’ या चित्रपटांची गाणी येथे चित्रित झाली आहेत. ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेतील काही प्रसंगही येथे चित्रित झाले आहेत. नव्वदच्या दशकात तर मराठी चित्रपटांमधील बहुतेक गाण्यामध्ये छोटा काश्मीर किंवा आरे कॉलनीचा परिसर दाखवला जायचा. काही हिंदी चित्रपटांनी तर काश्मीर म्हणून छोटा काश्मीरचा परिसर बेमालूमपणे दाखवला होता.
या बागेचे खास आकर्षण म्हणजे या बागेतील तलाव. निसर्गनिर्मित असल्याने हा तलाव सुंदर व नयनरम्य आहे. या तलावात बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन, चार किंवा सहा आसनी बोटी येथे असून त्यातून जलविहार करण्याची मजा काही औरच आहे. या तलावातून नौकानयन करताना छोटा काश्मीरचा सारा परिसर डोळय़ांत साठवून ठेवता येतो. अतिशय शांत, रमनीय आणि मन उल्हासित करणारा परिसर असल्याने येथे मनमुराद विहार करणे पर्यटकांना आवडते. तलावाच्या एका बाजूला मत्स्यबीज केंद्र आहे, तेथून माशांची पैदास केली जाते.
छोटा काश्मीरचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे असणारे विविध प्रकारचे पक्षी. शांत वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्याची सुंदर अनुभूती येथे मिळते. कोकिळा, बुलबुल, पोपट यांसह असंख्या विविधारंगी पक्षी येथे आढळतात. या बागेत तब्बल ८०० प्रकारची फुलझाडे आहेत, त्याशिवाय विविध प्राणी -पक्षी, कीटक, फुलपाखरे आढळतात. एवढी विपुल वनसंपत्ती आणि निसर्गसंपदा येथे असल्याने पर्यटकांचा नेहमीच छोटा काश्मीरमध्ये वावर असतो.
छोटा काश्मीर म्हणजे निसर्गाचे लेणे आहे या रमणीय परिसरास भेट देणे ही पर्यटकांसाठी सुंदर अनुभूती आहे.

कसे जाल?
* पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानाकाबाहेरून रिक्षा करून आरे कॉलनी किंवा छोटा काश्मीर येथे जाता येते.
* वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ६.

श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
in wardha Water Crisis Hits Bor Sanctuary
वर्धा : जंगलात पाणीटंचाई, प्राण्यांसाठी १५ बोअरवेलचे काम सुरू
mumbai south central lok sabha constituency marathi news
आमचा प्रश्न – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : प्रदूषण, आरोग्याचे प्रश्न मार्गी लागावे
Uran, Mango Trees Burn, Forest Fire, chirner, Farmers, Demand Compensation, Hundreds of Trees, marathi news,
उरण : जंगलातील आगीमुळे आंब्याच्या झाडांची राख