कापड व्यापारी भाविक दंड यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल करून सहाजणांना अटक केली. मात्र या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल न करता ‘खंडणीखोरी’ केल्याची बाब आयुक्त राकेश मारिया यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर या प्रकरणाचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. भाविक यांनी १५ ते २० लाख रुपयांचे कर्ज व्याजाने घेतले होते. प्रतिदिन आठ हजार रुपये असे रग्गड व्याज आकारले जात होते. व्याजापोटी अदा केलेली रक्कम मूळ रकमेपेक्षा अधिक असतानाही आरोपींकडून त्यांना धमकावले जात होते. त्यातच भाविक यांना १६ मार्च रोजी या आरोपींनी एका गोदामात नेऊन बेदम मारहाण केली. २० मार्चपर्यंत संपूर्ण रक्कम अदा न केल्यास मुलुंड परिसरात विवस्त्र करून धिंड काढू, असे धमकावले. अखेर १९ मार्च रोजी भाविक यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीला मारहाण झाल्याचे सांगितले होते. तसेच चिठ्ठीतही मारहाण -केल्याचे म्हटले होते. परंतु तरीही मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. या प्रकरणी दंड कुटुंबीयांनी आयुक्त मारिया यांची भेट घेऊन सारा प्रकार कानावर घातला. मुलुंड पोलिसांनी केलेल्या खंडणीखोरीची कहाणी ऐकून मारियाही सर्द झाले. अखेरीस त्यांनी या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी उशिराने गुन्हा दाखल करून रझ्झाक अब्बास (३९), दीपक मोरे (२८), जगदीश पटेल (३३), लालिजी पंजानी (६४), मयूर पालन (३४) आणि जयंती पटेल (३२) या सहाजणांना अटक करण्यात आली आहे. अटक टाळण्यासाठी पोलिसांवर खंडणीखोरीचा आरोपही कुटुंबियांनी केला. तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविल्याचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) धनंजय कमलाकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

पोलिसांनी चिठ्ठी लपविली?
मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत भाविक यांना मारहाण क रणाऱ्या सर्वाची नावे असतानाही पोलिसांनी ही चिठ्ठी सुरु वातीला लपविली, असा आरोप दंड कु टुंबीयांनी के ला आहे. वरिष्ठ निरीक्षक फु लसिंग पवार आणि निरीक्षक मनसुख हे प्रत्यक्ष घटनास्थळी गेले होते. त्यांनी चिठ्ठी ताब्यात घेतली होती. तरीही गुन्हा दाखल के ला नाही. अखेर आम्हाला वरिष्ठ पोलीस अधिकोऱ्यांक डे धाव घ्यावी लागली. त्यानंतरच मुलुंड पोलिसांना चिठ्ठी आढळली आणि गुन्हा दाखल झाला, असेही कु टुंबियांक डून सांगण्यात आले. सध्या आम्ही प्रचंड दहशतीखाली असून आम्हाला न्याय हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.