कामाला नव्या वर्षांत मुहूर्त; पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी

मुंबईमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेतर्फे राबवला जाणारा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे (कोस्टल रोड) काम अखेर नव्या वर्षांत मुंबईकरांच्या दृष्टिपथात येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या विविध कामांसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात नरिमन पॉइंट येथील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी या मार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे.

pune mumbai expressway
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या आठपदरीकरणाचा खर्च ६०८० कोटींच्या घरात, निधी उभारणीचे एमएसआरडीसीसमोर आव्हान
Quick Heal Technologies, a cybersecurity software company, kailash sanjay katkar
वर्धापनदिन विशेष: संगणकीय डॅाक्टर… ‘क्विक हिल’चे काटकर बंधू
New Town on Green Belt in Navi Mumbai The reservation of park in the municipal development plan has been cancelled
नवी मुंबईतील हरित पट्ट्यावर नवे नगर; शिळच्या सीमेलगत नागरी वसाहतींचा मार्ग मोकळा
part of commercial building obstructing widening of the road was demolished mumbai municipal corporation
रस्ता रुंदीकरणाआड आलेल्या व्यावसायिक इमारतीचा काही भाग तोडला, पश्चिम उपनगरात प्रथमच केला पालिकेने प्रयोग

मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. वाढती वाहन संख्या, रस्त्यांची मर्यादा अशी विविध कारणे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान सागरी किनारा मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबरअखेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा प्रशासनाचा मानस असून नव्या वर्षांमध्ये कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी प्रशासनाने गेल्या आठवडय़ात विविध कंपन्यांसाठी निविदा प्रक्रिया पूर्व बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विविध कंपन्यांचे १७ प्रतिनिधी सहभागी होते. या प्रकल्पाच्या कामाबाबत करण्यात येणारे कंत्राट, तंत्रज्ञान, वस्तू आणि सेवा कर आदी विविध विषयांबाबत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शंका उपस्थित केल्या होत्या. वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांनी या शंकांचे निरसन केले.

पुढील वर्षी कामाला सुरुवात

* पहिल्या टप्प्यात प्रियदर्शनी पार्क ते हाजी अली, दुसऱ्या टप्प्यात हाजी अली ते वरळी, तिसऱ्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क (बोगदा) कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहे.

* या प्रकल्पासाठी ३१ ऑक्टोबर रोजी निविदा सादर करण्याची अंतिम तारीख असून कंत्राटदारांनी सादर केलेली आर्थिक निविदा ४ डिसेंबर रोजी उघडण्यात येणार आहे.

* त्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करून त्यांना कार्यादेश देण्यात येणार आहे.

* डिसेंबर अखेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदारांची नियुक्ती होईल आणि नव्या वर्षांत सागरी किनारा मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी अपेक्षा पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

७७४ शंकांचे निरसन

निविदा प्रक्रिया पूर्व बैठकीमध्ये उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रियदर्शनी पार्क ते हाजीअली दरम्यानच्या कामाबाबत २७७, हाजीअली ते वरळीदरम्यानच्या  कामाबाबत २८०, प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानच्या बोगद्याबाबत २१७ अशा एकूण ७७४ शंका उपस्थित केल्या. या शंकांचे निरसन करण्यात आले, असे या पालिका अधिकाऱ्याने सांगितले.