भारतातील शहरीकरणांचा बळी ठरलेले ‘माळढोक’ पक्षी सध्या देशातून गायब होण्याच्या परिस्थितीत पोहोचले आहेत. या पक्ष्यांचे सध्याची स्थिती मांडणारे आणि त्यांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणारे पहिले ‘कॉफी-टेबल’ बुक प्रकाशित झाले आहे. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झरवेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या पर्यावरण क्षेत्रातील शिखर संस्थेच्या हवाई येथे झालेल्या जागतिक परिषदेत या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’ने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर लुप्त होणाऱ्या भारतीय पक्ष्यावर होणारा हा पहिलाच पुस्तक प्रकाशन सोहळा आहे.

भारतीय पर्यावरणीय परिक्षेत्रातून नाहीसा झालेल्या माळढोक पक्षी पर्यावरणवादी व जागतिक पक्षी मित्रांच्या चिंतेचा विषय ठरू लागला आहे. या पक्ष्याचे सध्याचे अधिवास जपण्याचे व वाढवण्याचे काम पक्षी मित्र करत असून ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’ने यावर पुढाकार घेऊन पुस्तक प्रकाशित केले आहे. हवाई येथे ‘आययूसीएन’च्या जागतिक परिषदेत या पुस्तकाच्या झालेल्या प्रकाशन सोहळ्याला आययूसीएनच्या डॉ. सुमन स्टुअर्ट, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे संचालक डॉ. दीपक आपटे, डॉ. वी. बी. माथूर, डॉ. के. सन्कार, डॉ. कैलाश चंद्र, पी. आर. सिन्हा आदी पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

भारतात ५० वर्षांपूर्वी अवघे १ हजार माळढोक पक्षी (ग्रेट इंडियन बस्टर्ड) होते. मात्र, आज या पक्ष्यांची संख्या अवघी २५० वर आली आहे. देशात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतच हे २५० पक्षी विखुरले आहेत. त्यामुळे या पक्ष्यांची जात अति-धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली असून पक्ष्यांची ही अवस्था त्यांचे खाद्य मिळण्याचे व प्रजनन होण्याचे अधिवास संपुष्टात आल्याने झाली आहे. कारण, गवताळ प्रदेश हे या पक्ष्यांचे अधिवास असून अशा जमिनींवर तात्काळ शहरीकरण लादले गेल्याने त्यांचे अधिवास नाहीसे होत आहेत. कॉर्बेट फाऊंडेशन गुजरातमधील कच्छ भागात या पक्ष्यांचा अधिवास जपण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहे.

पुस्तकाविषयी..

माळढोक पक्ष्याचे संपूर्ण जीवन विश्व या पुस्तकात विशद करण्यात आले आहे. जगातील काही नामवंत छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्रे या पुस्तकात असून गेल्या ३५ वर्षांपासून माळढोक पक्ष्यांचा अभ्यास करणारे व ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’चे माजी संचालक डॉ. असद रहमानी हे मुख्य लेखक आहेत. तर, ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’चे संचालक केदार गोरे व उप-संचालक देवेश गढावी यांनी सह-लेखन केले आहे. ‘आययूसीएन’चे अध्यक्ष झँग झिनशेंजे यांना त्यांनी या पुस्तकाची प्रतही सादर केली. या वेळी गढावी व गोरे यांनी हवाई येथील जागतिक परिषदेत या पक्ष्यांचे अस्तित्व संपुष्टात येत चालल्याबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. या वेळी परिषदेत ‘आययूसीएन’ व ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’ने माळढोक पक्ष्यांवर विशेष चर्चासत्राचेही आयोजन केले होते. यात माळढोक पक्ष्याच्या लेसर फ्लोरिकन आणि बेंगाल फ्लोरिकन या अन्य भारतीय प्रजातींच्या अस्तित्वाबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली.