कुलाबा-वांद्रे-सीप्झ या बहुप्रतीक्षित मेट्रो-३ मार्गाचे काम आता ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मार्गासाठी होणारा विरोध थांबेपर्यंत बांधकामाचा मार्ग मोकळा होत नव्हता. मात्र त्यावर तोडगा काढत मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशनने आता सहा टप्प्यांच्या कामासाठी चार कंत्राटदारांसह करार केला आहे.

बुधवारी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. आणखी एका कंत्राटदारासह करार होणे बाकी असले, तरी हा करारही लवकरच होणार आहे. दुसरीकडे एमएमआरडीएतर्फे बांधण्यात येणाऱ्या मेट्रो-७चे कामही वेगाने सुरू झाले आहे.

मुंबईतील पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्प असलेला मेट्रो-३ हा प्रकल्प सात टप्प्यांमध्ये होणार आहे. ३३.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात २७ स्थानकांचा समावेश आहे. त्यापैकी २६ स्थानके भूमिगत आणि एक स्थानक जमिनीवर असेल.

या मेट्रोचे बांधकाम पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. काम संपूर्णपणे भूमिगत होणार असले, तरी स्थानक परिसर, काम सुरू करण्याचे ठिकाण आदी ठिकाणी रस्त्यांवरही या कामाचा प्रभाव राहणार आहे.

कामाचे आणि कराराचे टप्पे 

  • एल ॅण्ड टीएसटीईसी (२९८८.५३ कोटी)

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक

  • एचएससीएमएमएस (२५२१.८९ कोटी)

सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव आणि ग्रँट रोड

  • डोगससोमा (२५५७.८४ कोटी)

मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी मेट्रो, सायन्स म्युझिअम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी

  • सीईसीआयटीडी (२८३०.१० कोटी)

सिद्धिविनायक, दादर मेट्रो, शितळादेवी

  • जे. कुमारसीआरटीजी (२८१७.०२ कोटी)

धारावी, बीकेसी मेट्रो, विद्यानगरी, सांताक्रूझ

  • जे. कुमारसीआरटीजी (२११८.४० कोटी)

सीएसआयए, सहार रोड, सीएसए इंटरनॅशनल

  • एल ॅण्ड टीएसटीईसी (२२८१.४५ कोटी)

मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ