भाजप आणि शिवसेनेमध्ये शनिवारी मुख्यमंत्री मदतनिधीसाठी पोलिसांचा पगार कापण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा ‘सामना’ रंगलेला पहायला मिळाला. नेपाळ येथील भुकंपग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदतनिधीतून रक्कम देण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे मे, जुलै महिन्यातील प्रत्येकी एका दिवसाचे वेतन कापण्यात येणार असल्याचे वृत्त शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून देण्यात आले होते. यासंदर्भात कोणतीच पूर्वसूचना देण्यात आली नाही. दुपारी १२च्या सुमारास वायरलेस संदेश पाठविण्यात आला आणि कुणाला मदत द्यायची नसल्यास त्यांनी दोन वाजेपर्यंत लेखी कळवावे, असे आदेश देण्यात होते. त्यामुळे पोलीस दलामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाल्याचेही या बातमीत म्हटले होते. या माध्यमातून शिवसेनेने थेटपणे मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्याच्या कारभारावरच ताशेरे ओढले होते. मात्र, शासनाने असा कोणताही निर्णय घेतलाच नव्हता. याउलट राज्य शासनाच्या काही कर्मचारी संघटनेतील लोकांनी आमच्यापाशी येऊन आपणहून मदत देण्याची इच्छा व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सामना वृत्तपत्राने योग्य ती माहिती घेऊनच बातमी द्यावी, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. गेल्या काही दिवसांमध्ये या वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्याने भाजपच्या नेत्यांना आणि धोरणांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्य