मुंबईतील तापमानात शनिवारी अचानक घट झाल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. परिणामी गेले दोन दिवस उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना थंडीने दिलासा मिळाला.
मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी पळाल्याची जाणीव नागरिकांना होऊ लागली होती. मात्र शनिवारी पुन्हा तापमानात घट झाली आणि थंडीने मुंबईकर पुन्हा एकदा सुखावले. मुंबईत २६ फेब्रुवारी रोजी कमाल ३१ अंश सेल्सिअस, तर किमान २१ अंश सेल्सिअस, तसेच २७ फेब्रुवारी रोजी कमाल ३० अंश सेल्सिअस, तर किमान २२ अशं सेल्सिअस तापमान होते. २८ फेब्रुवारीमध्ये त्यात बदल झाला नव्हता. त्यामुळे मुंबईकर उकाडय़ाची जाणीव होऊ लागली होती.
 मात्र शनिवारी अचानक कमाल तापमान २७, तर किमान तापमान २०.५ अंश सेल्सिअस झाले आणि पुन्हा एकदा मुंबईत गारठा जाणवू लागला.