शनिवारी सकाळी मालाडमधील मामलेदार वाडीतील पी उत्तर पालिका विभागासमोर पालिकेच्या कॉम्पॅक्टरने धडक दिल्याने एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे.
गंगाबेन बिरजीभाई जेटवा (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. गंगाबेन सकाळी सव्वाअकराच्या दरम्यान मुलाच्या सासू नंदूबेन विठ्ठलबेन िहगू (६०) यांच्यासोबत मालाड मामलेदार वाडी येथून कामानिमित्त रस्त्याने जात होत्या. त्या वेळी पालिका विभागातून बाहेर जाण्याकरिता इमारतीचा राडारोडा उचलणारा कॉम्पॅक्टर रस्त्यावर येत होता. कॉम्पॅक्टर मामलेदारवाडीच्या दिशेने वळण घेत असताना त्याच्या कोपऱ्याचा धक्का गंगाबेन यांना लागला आणि त्या खाली कोसळल्या. गंगाबेन यांना त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मालाड पोलिसांनी कॉम्पॅक्टर चालक वामन ढाकू मटकर (५२) याला अटक केली आहे.