संसदेत सध्या जे काही सुरू आहे ती म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती आहे, असं मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडले. ‘संसदेचं कामकाज बंद पाडणं हा सुद्धा एक लोकशाही मार्ग आहे. त्याच्यामुळे कामकाज चालण्यापेक्षा बंद पाडलं तर लोकांचं भलं होऊ शकतं’, असं विधान ७ सप्टेंबर २०१२ यादिवशी अरूण जेटली यांनी संसदेत केलं होतं.