राष्ट्रवादीने काँग्रेसने जागा वाटपाबाबत ताठर भूमिका घेतली असली तरी  त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी पडायचे नाही, तसेच  राष्ट्रवादीसोबत आघाडी नको ही कार्यकर्त्यांची भावना  दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्याचा निर्णय राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
 मुख्यमंत्री पृथ्वीरा चव्हाण , प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवाजीराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. राष्ट्वादीने एकीकडे १४४ जागांची मागणी करतांना  दुसरीकडे स्वबळाची भाषा सुरू केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्ये लक्षात घेता आघाडी कायम ठेवण्याबाबची  त्यांची भूमिका संशयास्पत असल्याचा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादीकडून आघाडीच्या चर्चेचा घोळ सुरू ठ़ेळून आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत गाफील ठेवण्याची शक्यता नकाराता येत नाही, राष्ट्रवादीने १४४ जागांची मागणी केली असली तरी जास्तीत  जास्त किती जागा सोडता येतील याचाही आढावा  बैठकीत घेण्यात आला. २००४मध्ये राष्ट्रावादीला १२४ जागा सोडण्यात आल्या होया. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्वादी काहीही दावा करीत असले तरी राजकीय परिस्थिती त्यांना अनुकूल नाही. २००९ मध्ये राष्ट्वादील ११३ जागा सोडण्यात आलया होत्या. त्यामुळे १२४ पेक्षा कमी जागा सोडाव्यात, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

आघाडी करण्यास विरोध
 राष्ट्रवादीच्या नेत्यांची संशयास्पद भूमिका लक्षात घेता, यंदा आघाडी करू नये अशी जिल्हा पातळीवरील कार्यत्यांची तीव्र भावना आहे, त्यामुळे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मने जाणून घेऊन ती पक्षश्रेष्टींच्या कानावर घातली जाणार असून राज्यातील नेत्यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी ठेवायची का नाही याचा सारा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.