विधिमंडळात पहिला ठराव कुणाचा यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत वाद

राज्य विधिमंडळात नेत्यांच्या कार्याचा गौरव करताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी की राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यापैकी कोणाचा ठराव आधी घ्यावा यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत धुसफुस सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आपापल्या नेत्याचा ठराव आधी व्हावा, अशी मागणी केली आहे.

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
Gadchiroli, Congress
गडचिरोली : घटक पक्षातील नाराजी व जातीय समिकरणाचे काँग्रेसपुढे आव्हान !
Yavatmal Shivsena Thackeray
यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल; अनुभवी व जुन्या शिवसैनिकांना दूर सारत नवीन कार्यकर्त्यांना संधी

शरद पवार यांच्या संसदीय कामगिरीस ५० वर्षे पूर्ण झाली. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे गेली चार दशके आमदार आहेत. या दोन नेत्यांच्या कामगिरीचा विधिमंडळात गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संसदीय कार्याचा गौरव करण्याची मागणी पुढे आली. मग इंदिरा गांधी, पवार आणि देशमुख यांचे ठराव विधिमंडळात करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या तीन नेत्यांच्या कार्याचा गौरव करणारे ठराव आणि त्यावर भाषणे असे कार्यक्रम पत्रिकेत दोन आठवडे दाखविण्यात आले होते. कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार घातला होता. त्यातून हे ठराव बारगळले.

पावसाळी अधिवेशनात  हे ठराव विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये करण्याचा निर्णय करण्यात आला. सत्ताधारी भाजपने नानाजी देशमुख आणि श्यामाप्रसाद मुखर्जी या नेत्यांचा यादीत समावेश केला. पाचही नेत्यांचे कार्य मोठे असल्याने ठराव एकाच दिवशी ठेवू नये, अशी मागणी करण्यात आली.

शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांचे ठराव आधी घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली. तशा आशयाचे पत्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभापतींना दिले. तर इंदिरा गांधी या माजी पंतप्रधान तसेच त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आल्याने त्यांचा ठराव आधी करावा, असे पत्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी दिले आहे.

कोणत्याही परिस्थितीत शरद पवार यांचा ठराव आधी घ्यावा, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. काँग्रेसने ही मागणी मान्य करावी, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.

अलीकडेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत इंदिरा गांधी यांचा ठराव आधी करावा, अशी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इंदिरा गांधी या माजी पंतप्रधान असल्याने त्यांचा ठराव आधी घ्यावा ही काँग्रेसची रास्त मागणी आहे. त्यातून तोडगा काढला जाईल.

– राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते