एका बांधकाम व्यावसायिकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारे ‘म्हाडा’चे उपअभियंता (वर्ग १) पंकज पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने सोमवारी अटक केली.

फिर्यादी बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे कामाठीपुरा भागात एका इमारतीच्या दुरुस्तीचे काम होते. त्याचे अंदाजपत्रक त्यांनी मंजुरीसाठी म्हाडाकडे पाठवले होते. त्याच्यावर स्वाक्षरी करून ते वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी ‘म्हाडा’च्या इमारत दुरस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे उपअभियंता (वर्ग १) पंकज पाटील यांनी एक हजार रुपयांची लाच मागितली. सोमवारी काळाचौकी येथील कार्यालयात पाटील यांना ही एक हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.