वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात बांधकाम करण्यात आलेल्या बेकायदा मजल्यांचे बांधकाम पाडण्याच्या संदर्भात संस्थेच्या अध्यक्षा आशालता फाळके आणि सचिव बाबुराव पोटे यांच्याविरोधात वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. पण अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही.
शीव येथील या महाविद्यालयाच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथा मजल्याचे भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने तिन्ही मजले त्वरीत रिकामे करण्याचे आदेश दिले होते. या संदर्भातील नोटीस १९ जून रोजीच पाठवली होती. मात्र या संदर्भात महाविद्यालयाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नव्हती. यामुळे महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली होती.