विक्रोळीतील पार्कसाईड एका घरात झालेल्या सिलेंडर स्फोटात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. तीन जणांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. परंतु, सलमा बेलीम (वय ४० वर्षे), मोहम्मद बेलीम (८ वर्षे) व मिराज बेलीम (१५ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)