यंदा या सणासुदीच्या दिवसांत मेट्रोने प्रवास करायचा असेल, तर मुंबई मेट्रोने सवलत देऊ केली आहे. सणासुदीच्या दिवसांत मुंबईकर फक्त दहा रुपयांत मेट्रोने प्रवास करू शकतात. तर १२ वर्षांखालील मुलांना पाच रुपये देऊन मेट्रो सवारी करता येणार आहे. ऑक्टोबरमधील सर्व शनिवार-रविवार, सार्वजनिक सुटय़ांचे दिवस, सणासुदीसाठी ही सवलत लागू असेल. यात २ ते ५, २३ ते २६ ऑक्टोबर व ११-१२ व १८-१९ ऑक्टोबर दिवशीही तिकीट सवलतीत मिळेल.