डेव्हिड कोलमन हेडलीची टेलिकॉन्फरन्सद्वारे उलट तपासणी सुरू आहे. या तपासणीत त्याने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. राजाराम रेगेच्या मदतीने अमेरिकेत शिवसेनेसाठी मदतनिधी कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार होता. या कार्यक्रमासाठी बाळासाहेब ठाकरे यांना बोलावून तेथे त्यांना ठार मारण्याचा कट करण्यात आला होता, असा खुलासा हेडलीने केलायं.
राजाराम रेगेच्या मदतीने अमेरिकेत शिवसेनेसाठी मदतनिधी कार्यक्रम करण्याची योजना आखली होती. या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना निमंत्रित करण्याचे ठरले होते. मात्र त्यावेळी बाळासाहेबांवर हल्ला करण्याचा कोणताही विचार नव्हता, असा आणखी एक गौप्यस्फोट डेव्हिड हेडली याने केल. बाळासाहेबांचे वय झाले आहे. त्यांची प्रकृती चांगली नसते असे रेगेने सांगितले. त्यानंतर बाळासाहेबांचा मुलगा तसेच शिवसेनेच्या अन्य नेत्यांना आमंत्रित करण्याबाबत विचारणा मी केली होती, असेही हेडलीने उलटतपासणी दरम्यान सांगितले.
तसेच त्याने सांगितले की, शाळेत असतानाच भारताविषयी माझ्या मनात द्वेष निर्माण झाला होता. ७ डिसेंबर १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात माझी शाळा उद्ध्वस्त झाली. या हल्ल्याचा बदला घेण्याचा निश्चय केला आणि लष्करशी जोडला गेलो अशी स्पष्ट कबुली हेडलीने दिली आहे. मी अमेरिकेत कोणत्या तुरुंगात आहे, हे सांगू शकत नाही. मला येथे कोणत्या सुविधा मिळत आहेत, त्याविषयीही माहिती देणार नाही, असे हेडलीने म्हटले आहे.
हेडलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर पाकचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी हेडलीच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती.