औषध खरेदीत कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर निलंबित करण्यात आलेल्या आरोग्य संचालक, सहसंचालक व दोन साहाय्यक संचालकांची चौकशी निलंबनाला महिना उलटला तरी अद्यापि सुरू करण्यात आलेली नाही. मुळात विरोधी पक्षाने औषध खरेदीतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली असताना आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य संचालकांसह चौघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केल्यामुळे आरोग्य विभाग हादरून गेला होता. निलंबनाला महिना उलटल्यानंतरही चौकशी होत नसल्याने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाने ५४९ प्रकारची औषध खरेदीत २९७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात केला. या प्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार,

सहसंचालक डॉ. राजू जोतकर यांच्या निलंबनाची घोषणा केली.
डॉ. जोतकर हे प्रामाणिक अधिकारी असताना त्यांच्या निलंबनामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. परिणामी ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून वस्तुस्थिती लोकांपुढे येणे आवश्यक आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री