मॉडेलवर लैंगिक अत्याचार करून तिच्या मित्राकडून ४ लाख उकळणाऱ्या साकीनाका पोलीस ठाण्यातील ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसन्ना मोरे यांची विशेष शाखेत तर परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर यांची सशस्त्र दलात बदली करण्यात आली आहे.अंधेरी येथील एका मॉडेलला  पकडून संघर्ष नगर पोलीस चौकीत  सहाय्यक पोलीस निरीक्षक खटापे, सूर्यवंशी आणि पोलीस हवालदार कोडे यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी मॉडेलने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यांनतर या तीन पोलिसांसह आठ जणांना बलात्काराच्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली होती. त्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली. हे प्रकरण प्रसन्ना मोरे यांना माहीत होते, तरी त्यांनी पोलिसांना पाठिशी घातले असा त्यांच्यावर आरोप आहे. तर या मॉडेलने तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याबद्दल उपायुक्तांना दोषी धरण्यात आले आहे.