कृषी तंत्रज्ञानाविषयक अभ्यास दौऱ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेवृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आज सायंकाळी इस्रायलच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले.
हा दौरा इस्रायल सरकारच्या निमंत्रणावरुन आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसह विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव दिनेश कुमार जैन यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. तेल अविव विद्यापीठात होणाऱ्या या परिसंवादाचे मुख्यमंत्री इस्रायलच्या कृषी व अर्थमंत्र्यासह संयुक्तरित्या उद्घाटन करणार आहेत.कमीत कमी पाण्यात अधिक पिके घेण्याच्या इस्त्रायली तंत्रज्ञानाची माहिती राज्याचे शिष्टमंडळ घेणार आहे.  पाण्याच्या बचतीसह पुनर्वापर तंत्रज्ञानाबाबतही माहिती घेणार आहे. मराठा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, फिनोलेक्स, जैन इरिगेशन आदींसह प्रमुख इस्त्रायली उद्योग समूह महाराष्ट्रातील संस्थाशी याबाबतीत सहकार्य करण्यास उत्सुक आहेत.