हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रात्री २ वाजता रुग्णालयात दाखव करावे लागले. मात्र ते अतिदक्षता विभागात नाहीत, अशी माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्‍टर जलील पारकर यांनी दिली. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु असून आणखी काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.