वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेला एक महिना झाल्यानंतर सरसकट दहा रुपयांऐवजी १० रुपये, १५ रुपये आणि २० रुपये असे वाढविण्यात आलेले नवीन दर सप्टेंबर महिना संपेपर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्टीकरण ‘मुंबई मेट्रो वन’ने उच्च न्यायालयात दिले आहे.
मुंबई मेट्रो स्थानकांवर ‘वाय-फाय’ सुविधा
यामुळे आता सप्टेंबरपर्यंत तरी मेट्रोच्या प्रस्तावित कमाल ४० रु भाडेवाढीला प्रवाशांना समोरे जावे लागणार नाही. दहा रुपये ते ४० रुपये या प्रस्तावित दराचा वाद उच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे १० रुपये, १५ रुपये आणि २० रुपये असे नवे दर मुंबई मेट्रोला महिनापूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आले होते. हे दर पुढील महिनाभर लागू राहतील असे जाहीर करण्यात आले होते.
व्हिडिओ…जेव्हा पहिल्या पावसात मेट्रोही गळायला लागते!
मेट्रो रेल्वेच्या दरांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. सवलतीचा नवीन दर लागू करण्याची मुभा आहे, असे ‘एमएमओपीएल’ने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर लागू केलेले नवे सवलतीचे दर सप्टेंबर महिन्यापर्यंत कायम राहतील असे ‘मुंबई मेट्रो वन’कडून सांगण्यात आले आहे.
यानुसार, तीन किलोमीटपर्यंत १० रुपये, तीन ते आठ किलोमीटपर्यंत १५ रुपये आणि त्यापुढे २० रुपये असाच दर सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.