विधानसभेत आज परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजप आमदारांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर दिवाकर रावते आक्रमक झाले. रावते आणि भाजप आमदारांमध्ये बाचाबाची झाली आणि विधानसभेत सत्ताधाऱयांमध्ये जुंपली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार राम कदम आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले.

भाजपचे आमदार सुधाकर देशमुख, रामचंद्र अवसरे, आशिष देशमुख हे वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देत होते. त्यावेळी दिवाकर रावते यांनी अखंड महाराष्ट्राची भूमिका मांडत भाजप आमदारांवर धावून गेले. प्रकरण वाढत जात असल्याचे लक्षात येताच विनोद तावडे, गिरीष महाजन आणि राम कदम यांनी प्रकरण मिटवले.

lok sabha election 2024 congress in limelight after kanhaiya kumar nominated from north east constituency in delhi
कन्हैया कुमारांमुळे दिल्लीत काँग्रेस चर्चेत
Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक
arunachal cm among 10 BJP candidates elected unopposed in assembly election
अरुणाचलमध्ये भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध; मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्यांदा बिनविरोध
Wide gap between young women and man in electoral rolls in Jalana
जालन्यातील मतदारयाद्यांमध्ये तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत

वाचा: स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरुन विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विधान परिषदेतही आज स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून गदारोळ माजला. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आज लोकसभेत स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव मांडला. यावरून धनंजय मुंडे यांनी भाजपला लक्ष्य केले. भाजपच्या खासदाराकडून लोकसभेत स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव आणण्यात सरकारची भूमिका काय? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. भाजपला महाराष्ट्र तोडायचा आहे का? असेही मुंडे म्हणाले. त्यानंतर सुरू झालेल्या वादानंतर विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.