राज्य सरकारने मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वस्त केल्यामुळे ‘महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटने’ने (मार्ड) शनिवारपासून उपसलेली बेमुदत संपाची तलवार म्यानातच राहिली आहे. येत्या १५ दिवसांत मार्डच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन सरकारने संपकरी निवासी डॉक्टरांना दिले. त्यामुळे, शुक्रवारी रात्री उशीरा मार्डने संपाची घोषणा मागे घेत ली.‘रात्री उशिरापर्यंत आमच्या मागण्यांच्या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा सुरू होती.