भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्यभरासह देशभरातील लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. चैत्यभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमाची लेकरे येथे आली आहेत.
पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. चैत्यभूमीच्या परिसरात सागरी पेट्रोलिंग केली जाणार आहे. याठिकाणी दोन हजार पोलिस कर्मचारी आणि तीन हजार समता सैनिक तैनात करण्यात आले आहेत. दरवर्षी विविध आंबेडकरी स्टॉल्सनी फुलणाऱ्या या परिसरात यंदा मात्र तुरळक स्टॉल्स दिसून येत आहेत. दुरुन येणाऱ्या लोकांनाही नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षी महापरिनिर्वाण दिनी सुरु झालेलं ‘एक वही, एक पेन’ अभियान यंदाही राबवण्यात येत आहे. फेसबुक आंबेडकराइट मूव्हमेंट (फ्याम) या संघटनेने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

सोलापूर, अहमदनगर, जळगाव, नाशिक, सांगली, कोल्हापूर आदी भागातून भीम अनुयायी रात्रीपासूनच चैत्यभूमीवर दाखल होत होते. महापालिका प्रशासनानेही दादर रेल्वे स्टेशन ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केला आहे. स्वच्छता ठेवण्यात आली आहे व आलेल्या लोकांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. या वेळीही युवक, युवती मोठ्याप्रमाणावर चैत्यभूमीवर जमल्या आहेत. काही सामाजिक संस्थांनी मोफत वैद्यकीय शिबिर, नेत्रतपासणीसह जेवणाचीही सोय केली आहे.

solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Nandurbar district bus conductors murder solved son-in-law killed father-in-law due to a family dispute
सासऱ्यासाठी जावईच काळ, नंदुरबार जिल्ह्यातील बस वाहकाच्या हत्येची उकल
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!