निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा आणि ज्ञान वृद्धिंगत करण्याकरिता आयोजिल्या जाणाऱ्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध होईल.

ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

डॉ. होमी भाभा लेखी स्पर्धेचे आयोजन १ ऑक्टोबरला करण्यात आले होते. ही स्पर्धा राज्यातील २२० केंद्रांवर घेण्यात आली असून ५३,५७९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यात इयत्ता सहावीचे २,१०८ आणि नववीच्या १,८०० मुलांची निवड प्रात्यक्षिक स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. मुंबई विभागाची प्रात्यक्षिक स्पर्धा सोशल सव्‍‌र्हिस लीग हायस्कूल, दामोदर सभागृह कॅम्पस, परेल या परीक्षा केंद्रावर होणार आहे.

तर ठाणे विभागात एम.एच.हायस्कूल, शिवाजी पथ, ठाणे (प) या ठिकाणी होणार आहे. पुणे आणि वर्धा या विभागातील स्पर्धा एम.ई.एस. बाल शिक्षण, इंग्रजी माध्यम शाळा, कोथरुड, पुणे येथे घेण्यात येईल.

मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या www.msta.in या संकेतस्थळावर लेखी स्पर्धेचा निकाल देण्यात आला आहे.

इयत्ता सहावीची प्रात्यक्षिक परीक्षा रविवारी, ११ डिसेंबर आणि नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रविवारी, १८ डिसेंबर रोजी होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या दिवशी आणि वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन ‘मुंबई विज्ञान अध्यापक मंडळा’तर्फे करण्यात आले आहे. तसेच मंडळाच्या संकेतस्थळावर ‘अ‍ॅडमिशन कार्ड फॉर प्रॅक्टिकल’ देण्यात आले असून ते डाऊनलोड करावे. त्यावर विचारलेली माहिती भरण्यात यावी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व स्टॅम्प घ्यावे. परीक्षा केंद्रावर येताना विद्यार्थ्यांनी हे माहितीपत्रक सोबत आणावे. अधिक माहितीसाठी संपर्क – ०२२-२८८०६९९५.