मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्तपणे सर्वत्र बंद पाळण्यात आला. या बंदबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रतिक्रिया फेसबुकवर व्यक्त करणाऱ्या आणि त्यावर 'लाइक' करणाऱ्या दोघींना पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. शाहीन धाडा असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून, ती पालघरची राहणारी आहे. 'आपण भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृती जागविल्या पाहिजेत. ठाकरे यांच्या निधनानंतर बंद करायला नको,' असे या तरुणीने फेसबुकवर म्हटले होते, असे समजते. त्यावरून पोलिसांनी तिला कलम ५०५ (२) नुसार अटक केली. शाहीन धाडाची फेसबुक मैत्रीण रेणू हिने या प्रतिक्रियेला 'लाईक' केले म्हणून तिलाही या कलमान्वये अटक करण्यात आली होती. सोमवारी त्यांना जामीन देण्यात आल्याचे त्यांचे वकील सुधीर गुप्ता यांनी सांगितले. या प्रतिक्रियेमुळे संतप्त झालेल्या सुमारे ४० शिवसैनिकांच्या जमावाने रविवारी धाडा हिच्या नातेवाईकांच्या पालघर येथील रुग्णालयातील मालमत्तेची नासधूस केल्याचेही समजते.
दरम्यान, कोकण परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांना या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.



















हि जी कोणी शाहीन का फाहीन आहे न तिने जरा हि अक्कल जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, ओरिसा येथे जाऊन पाजलावी. तिकडे जास्त गरज आहे अश्या विचारांची. इतकी जर हिला भागात सिंग आणि सुखदेव ह्यांची चाड आहे तर हि बया फेस बुक वर काय करतेय. जा लोकांमध्ये जाऊन काम करून दाखव कि. फुकट आईबाबांनी कमावून दिलेल्या इंटरनेट वरून मुक्ताफळ उधळण्या पेक्षा काही करून दाखव म्हणावं.
आणि ह्या मूढमती ला भगतसिंग / सुखदेव ह्यांची तरी पुरेशी माहिती आहे का? उगाचच नावे घ्यायची म्हणून घ्यायची? भगतसिंग / सुखदेव चे कार्य वेगळे.आणि बाळासाहेबांचे वेगळे. ह्यात तुलना करण्याचा प्रश्नच कुठे येतो?
फुटकळ गोष्टींची अवाजवी दाखल घेतल्याने त्या मोठ्या होतात. हिच्यासारखे विचार अनेकांनी मांडले आहेत. दखल घेण्यायोग्य गोष्ट नाही, याहून महत्वाच्या बऱ्याच गोष्टी घडत असतात. अटक आणि राडा यांनी निष्कारण हे प्रकरण चिघळणार, दुसरे काही नाही.