महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटनेच्या सर्व मागण्या आणि समस्या आपण समजवून घेतल्या असून, या संदर्भात अभ्यास करून आणि संबंधितांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिल्यानंतर संघटनेच्या समन्वय समितीने आपल्या मागण्यासाठी पुकारलेला २ फेब्रुवारीचा प्रस्तावित ‘बंद’ मागे घेतला.
महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीचे निमंत्रक अरुण थोरात, माजी आमदार भगवानराव साळुंखे, वेणूनाथ कडू आदिंनी तावडे यांची भेट घेतली आणि आपल्या मागण्यासंदर्भात त्यांना निवेदन सादर केले. यावेळी तावडे आणि समितीच्या पदाधिकाऱ्यामध्ये चर्चा झाली. शिक्षण संघटनेचे सर्व प्रश्न आणि त्यांच्या समस्या या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे समन्वय समितीने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन २ फेब्रुवारीचे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन यावेळी तावडे यांनी केले.