विजेचा धक्का लागून एका महिलेसह तिच्या चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ट्रॉम्बे चिता कॅम्प येथे मंगळवारी रात्री ही दुर्घटना घडली.
    मानखुर्दच्या चिता कॅम्पमधील सेक्टर डीमध्ये परवीन मोहम्मद इस्लाम शेख (३५) ही महिला पती आणि मुलगा फैजान (४) यांच्यासह राहत होती. मंगळवारी रात्री त्यांच्या घरातील पाण्याची टाकी भरून वाहू लागली. हे पाणी भिंतीत शिरले. मीटरमध्येही पाणी गेले होते. त्यांच्या घरात असलेल्या पोटमाळ्यावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी शिडीत हा विद्युत प्रवाह उतरला होता. फैजान याने खेळता खेळता त्या लोखंडी शिडीला हात लावल्याने त्याला विजेचा झटका लागून तो शिडीला चिकटला. त्याला वाचविण्यासाठी परवीन गेली, मात्र तिलाही विजेचा धक्का लागला.