फिल्मसिटीमध्ये छायाचित्रणासाठी आणलेल्या एका हत्तीणीचा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाल्याचे समजते. ‘रुपा’ असे या हत्तीणीचे नाव होते.

एका प्रॉडक्शन कंपनीने छायाचित्रणासाठी शुक्रवारी फिल्म सिटी येथे ‘रुपा’ नावाच्या हत्तीणीला आणण्यात आले होते. छायाचित्रण सुरू होण्यापूर्वीच ‘रुपा’चा मृत्यू झाला. ‘रुपा’चे वय साधारण ४२ ते ४५ वर्षे होते. या घटनेस आरे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. ‘रुपा’विषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.