ठाणे महापालिका संचालीत चिंतामणराव देशमुख  प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी २९ जून रोजी सकाळी साडेदहा ते बारा यावेळेत बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या धर्तीवर सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) स्वरूपाची ही परीक्षा असेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी १० जुलै रोजी जाहीर करण्यात येईल.