इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या राकेश सरना यांनी त्यांच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा हा राजीनामा इंडियन हॉटेल्स कंपनीने स्वीकारला असून ३० सप्टेंबरनंतर राकेश सरना त्यांचा कार्यभार सोडतील असं इकाॅनाॅमिक टाईम्सने म्हटलं आहे. इंडिय़न हॉटेल्स कंपनीकडे ‘ताज हॉटेल्सचं व्यवस्थापन आहे

राकेश सरना हे  आयएचसीएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त झालेले हाय प्रोफाईल हॉटेलिअर होते. या पदावर त्यांची नेमणूक सायरस मिस्त्री टाटा सन्सच्या अध्यक्षपदी असताना झाली होती. ताज हॉटेल्सचे व्यवस्थापन इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ही कंपनी पाहते. त्याच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचाच राजीनामा दिलेले राकेश सरना याच्यावर असलेल्या लैंगिक अत्यचाराच्या आरोपामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. कंपनीअंतर्गत नेमण्यात आलेल्या समितीने त्यांना या आरोपातून दोषमुक्त जरी केलेलं असलं तरी त्यांच्यावर असलेल्या या आरोपांची चर्चा हॉटेलविश्वात आहेच. त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिलेने सरना यांना दोषमुक्त करण्याच्या कंपनीच्या निर्णयावर नाखुषी व्यक्त केली होती.

राकेश सरना हे २०१४ साली इंडियन हॉटल्समध्ये रूजू झालेलं मोठ नाव होतं. त्यांनी त्या पदावर दीर्घकाळ असणाऱ्या रेमंड बिक्सन यांची जागा घेतली होती. इंडियन हॉटेल्समध्ये येण्याआधी ते ‘हयात ग्रुप ऑफ हॉटेल्सचे दक्षिण अमेरिकेतले प्रमुख होते.

सरना यांच्या राजीनाम्याचा विषय आयएचसीएल च्या मीटिंगच्या अजेंड्यामध्ये शुक्रवारी घेण्यात आला होता. नॉमिनेशन कमिटीच्याही मीटिंगमध्ये राकेश सरना याच्या राजीनाम्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. आयएचसीएलमधून राजीनामा दिल्यावर त्यांनी अमेरिकेला जायचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सभेत सांगितलं. टाटा समूहाच्या चेअरमन्सना राकेश सरना हे राजीनामा देणार आहेत याची कल्पना होती असं सांगितलं जात आहे