मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी विशेष सुरक्षा सप्ताह राबवूनही काहीही परिणाम होत नसल्याने अखेरीस राज्य महामार्ग पोलिसांनी या अपघातांमागील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तामिळनाडूतील एका तज्ज्ञ कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून या कंपनीने नोव्हेंबरपासून या कारणांचा बारकाईने शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीचा अहवाल दोन-तीन महिन्यांत मिळण्याची अपेक्षा आहे.
राज्य महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक विजय कांबळे यांनी याला दुजोरा दिला आहे. एक्स्प्रेस-वेवर उभ्या असलेल्या एका वऱ्हाडी बसला टेम्पोने दिलेली धडक असो वा एका मार्गावरील गाडी नियंत्रण सुटल्यामुळे विरुद्ध मार्गावर जाऊन अन्य गाडीवर आदळणे आदी अपघात पाहता केवळ अतिवेगच त्यास कारणीभूत आहे हे खरे आहे. वेगावर नियंत्रण ठेवावे, यासाठी कितीही सुरक्षा सप्ताह राबविले तरीही लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली नाही. त्यामुळेच महामार्गावरील अपघातांची कारणमीमांसा आम्ही सुरू केली होती. त्यानुसारच तामिळनाडूतील जे. पी. रिसर्चर या कंपनीला याबाबत अहवाल सादर करण्यात सांगितले आहे. या कंपनीने तामिळनाडूमध्ये अपघात रोखण्याबाबत सुचविलेले उपाय उपयोगी ठरले होते.
अपघात का होतात यासह अपघात रोखणे कसे शक्य आहे, याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून या कंपनीने शोध घेतला होता. एक्स्प्रेस-वेवर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पाश्र्वभूमीवर या तज्ज्ञ कंपनीने आमच्याकडे प्रस्ताव दिला होता. तो पटल्याने आम्ही त्यांची नियुक्ती केली आहे. एक्स्प्रेस-वेवरील अपघात ही सर्वाचीच चिंतेची बाब असल्यामुळे त्याबाबत काय करता येईल, यासाठी सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.
'एक्स्प्रेस-वे'वर होणाऱ्या अपघातांना अतिवेगच कारणीभूत आहे, हे सांगण्याची गरज नाही. सोमवारी मारुती स्विफ्ट गाडीला झालेला अपघात ही त्याचीच परिणती आहे. मुंबईतील रस्त्यावर धावण्याऱ्या गाडय़ा जर ताशी १३० ते १४० वेगाने धावू लागल्यावर त्यावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता अधिक आहे, असे मतही कांबळेही यांनी व्यक्त केले.
तज्ज्ञांनी दाखविलेल्या काही त्रुटी
ऌ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची बांधणी होऊन आठ-दहा वर्षे झाली आहेत. मात्र या रस्त्याची देखभाल योग्य पद्धतीने होत नाही. वास्तविक त्यामुळे रस्ते बुळबुळीत होऊन गाडीने वेग घेतला तरी त्याची जाणीव होत नाही.
ऌ रस्ता दुभाजकाची कमी उंची
ऌ कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अनुपलब्धता
ऌ कायमस्वरूपी स्पीड गनची व्यवस्था
एक्स्प्रेसवेवरील अपघातातील मृत - ८४१
महामार्ग पोलिसांनी केलेली कारवाई (१५ ऑगस्ट २००९ ते डिसेंबर २०१३ पर्यंत) - अतिवेग वा तत्सम प्रकरणे दाखल - २,०१,५८०

















कसला शोध घेत आहात ? आम्ही ६ वर्षे उप डाऊन करत आहोत आम्हाला विचार – पुण्याला वाकड जवळ जे गुंड खाजगी गाड्यामध्ये १० लोक भरून नेतात तेच कारण आहे .. हे लोक नियम पळत नाहीत १५० रुपयात २ तासात मुंबई – पुणे …
यांना पकडायचे असेल तर , वाकड हिंजेवाडी पुलाखाली आणि वाशी बस डेपो , आणि दादर पुलाखाली …
हो तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण मला वाटते कि आपणच आपल्या मित्रांना नातेवाईकांना सांगायला पाहिजे कि तुम्ही अश्या गाड्यांतून प्रवास करू नका डिमांड कमी झाली कि आपोआपच गाड्याही कमी होतील
‘आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करत संधीचे सोने करण्यात’ आपल्या प्रशासन आणि राजकर्त्यांचा हात कोणीच ठरू शकणार नाही. एक्सप्रेस वे वरील अपघातांच्या कारणांचा तज्ञा मार्फत तपास (होय ! तज्ञ म्हणजे करोडो रुपये घेऊन जे सर्वाना समजते ,दिसते ती सांगणारी यंत्रणा ), अपघात टाळण्यासाठी लोणावळा ते तळेगाव नाक्यापर्यंतच्या २० किमी अंतरात सुमारे ३ फुट उंचीचे सिमेंटचे दुभाजक , मार्गाच्या दोन्ही बाजूला सिमेंटची भिंत , कायम स्वरूपी स्पीडगनची व्यवस्था या सम उपाय योजनांचे प्रस्ताव तयार केले आहेत. सर्वात महत्वाचे हे की , अपघाताचे मूळ हे अनियंत्रित वेगात आहे हर सर्वज्ञात आहे . हे सांगण्यासाठी तज्ञाची गरज पडते हेच मुळात हास्यास्पद ठरते .
“आग रामेश्वरी ,बंब सोमेश्वरी” असा हा तुघलकी कारभार दिसतो . आपल्या देशात कमाल वेगाचे बंधन किती हे एकदा सबंधित विभागाने जनतेला सांगावे . त्याच बरोबर कमाल वेगापेक्षा अधिक क्षमता असणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यामागे वाहतूक परिवहन विभागाची ‘दूरदृष्टी ‘कोणती याचाही खुलासा करावा . मुळात वाहनांचे स्पीडोमीटर ८० पेक्षा जास्त असूच नयेत .काही वाहने विदेशी असल्यामुळे तसे बधान घालणे शक्य नाही हा युक्तीवाद तकलादू आहे कारण वाहनाची कमाल मर्यादा नियंत्रण करणारी ‘गर्व्हनस’ करणारी यंत्रणा उपलब्ध आहे . भविष्यात ती अनिवार्य करावी . अपघात होऊच नयेत अशी उपाय करण्यापेक्षा अपघाताचे परिणाम ‘शीतल ‘ करण्यात जनतेच्या पैशांचा ‘धूर ‘ करण्यातच संपूर्ण यंत्रणा धन्यता मानताना दिसते .
दलाला कडून वितरीत होणारे अ -दर्जेदार वाहतूक परवाने , भ्रष्टाचाराने माखलेली यंत्रणा , वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा “शिट्टी ,दंड , तडजोड” या संस्कृतीचा अंगीकार , राजकीय हस्तक्षेप या कारणांकडे वाहतूक आणि परिवहन विभागाने प्रथम लक्ष द्यावे .जनतेच्या पैशाला ‘लक्ष्य ‘ करण्यात हातभार लावण्या आधी याचा विचार व्हॅयला हवा . लेनची शिस्त पाळली जात नाही म्हणून भविष्यात प्रत्येक लेनला ‘डीव्हायडर ‘ टाकण्याची सुपीक कल्पना ‘रस्त्यावर ‘ येऊ शकते .
कमाल वेग बंधनापेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना परवानगी देणारा परिवहन आणि वाहतूक विभागच सकृतदर्शनी तरी ‘गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात ‘ उभा दिसतो .