मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
वांद्रे-कुर्ला परिसरात एका गाडीमध्ये कोंडून ठेवलेल्या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला आहे. काल (रविवार) रात्री सलमान शेख, त्यांची पत्नी आयेशा शेख आणि दोन मुलांना डांबून ठेवलं असल्याचं स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर या कुटुंबाची सुटका करण्यात आली. मात्र, आयेशा यांचा मृत्यू झाला आहे. तर सलमान शेख यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृत महिलेचे हात आणि पाय बांधलेले होते. महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीप्रमाणे ते वांद्रे-वरळी सागरीसेतूच्या दिशेने प्रवास करत होते. मात्र, मागून एक गाडी आली आणि त्यांना थांबण्यास भाग पाडले. त्यातून तीन पुरूष उतरले आणि त्यांनी पतीला मारहाण केली व नंतर त्याचे हात-पाय बांधले. यामध्ये गुन्हेगारांनी काहीच चोरी केले नसल्याचे प्रथमदर्शी समजते. दरम्य़ान, पतीसह आणखी तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक अंदाजानूसार पत्नीच्या हत्येसाठी पोलिसांचा संशय पतीवर असून अधिक तपास सुरू आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















