विविध राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांनंतर प्रसारमाध्यमे आणि विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला चांगलेच धारेवर आहे. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मोदींना उद्देशून ‘फेकू’ हे बिरूद लावण्यात आले होते, त्याचाच संदर्भ घेत टि्वटरकरांनी मंगळवार हा ‘वर्ल्ड फेकू डे’ (#WorldFekuDay) म्हणून साजरा केला. विशेष म्हणजे बुधवारीही #HappyBirthDayPM नंतर #WorldFekuDay हा हॅश टॅग इंडिया ट्रेंडिंग लिस्टमध्य़े दुस-या स्थानवर ट्रेंड करत आहे. तसेच पहिल्या पाचमध्ये निवडणुकीशी संबंधीत #bypollresults, #ModiFailsTest, #IncredibleASUS हे हॅश टॅग दुपारी बारा वाजेपर्यंत ट्रेंड करीत होते.
भाजपच्या आमदारांनी खासदारकी मिळवल्यानंतर रिक्त झालेल्या २४ जागांसह नऊ राज्यांत झालेल्या ३२ विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीत भाजपला अवघ्या बारा जागा जिंकता आल्या. गेल्या दोन महिन्यांत बिहार, उत्तराखंड, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांतही भाजपची कामगिरी घसरली होती. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेला ओहोटी लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘वर्ल्ड फेकू डे’ (#WorldFekuDay) चे काही निवडक टि्वटस;