मुंबईतील सायन स्थानकावर एका महिला टीसीने तरुणीला मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली आहे. या मारहाणीत ती तरुणी बेशुद्ध झाली असून या घटनेनंतर संतापलेल्या प्रवाशांनी महिला टीसीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे.

बुधवारी सायन स्थानकावर महिला टीसीने एका तरुणीला अडवले होते.  त्या तरुणीने दंड भरल्यानंतरही त्या तरुणीला टीसीने बसवून ठेवल्याचा आरोप केला जात आहे.  यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि  या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.  टीसीने केलेल्या मारहाणीत संबंधीत तरुणी बेशुद्ध झाली. यामुळे प्रवाशांचा पारा चढला आणि संतप्त प्रवाशांना थेट महिला टीसीलाच चोप देत तिला पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी मारहाण करणा-या महिला टीसीला ताब्यात घेतली आहे. पुढील चौकशी सुरु असून संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मारहाणीत बेशुद्ध झालेल्या तरुणीचे नाव आणि ती कुठे जात होती हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.